Vijay-Trisha : ‘करुप्पु’च्या स्क्रिनिंगवेळी गर्दीतून एक आवाज आला, त्याने विजयच नाव घेतं त्रिशाला म्हटलं की, तू..
Vijay-Trisha : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत नाव जोडलं जात असल्याने चर्चेत असलेली अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा 'करुप्पु' हा तामिळ चित्रपट एक दिवस उशिराने रिलीज झाला आहे. त्रिशा संदर्भातील प्रत्येक गोष्टीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे.

सोशल मीडियावर अजूनही त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांची चर्चा आहे. दोघांपैकी एकानेही अजून त्यांचं नातं कन्फर्म केलेलं नाही. पण त्यांच्यावर चाहत्यांचं बारीक लक्ष आहे. दोघे कधी कुठल्या कार्यक्रमात एकत्र येतात, कधी त्यांच्यात संवाद होतो यावर फॅन्स लक्ष ठेऊन आहेत.

नुकताच त्रिशाचा तामिळ चित्रपट 'करुप्पु' रिलीज झाला. त्याच्या स्क्रिनिंगसाठी त्रिशा कृष्णन थिएटरमध्ये आली होती. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आरजे बालाजी आणि अभिनेता कार्ती सोबत होता. रोहिणी थिएटरमधला सकाळचा शो हाऊस फुल्ल होता.

थिएटर मधून निघाल्यानंतर त्रिशा कृष्णन तिच्या कारमध्ये जाऊन बसली. तिने ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्स असा पेहराव केला होता. त्यावेळी चाहते तिच्या कारच्या आसपास मोठ्या संख्येने जमले होते. ते त्रिशाला शुभेच्छा देत होते.

या गर्दीमधून एका चाहत्याचा आवाज आला. 'थलपती विजय यांना माझ्या शुभेच्छा द्या' एका चाहत्याच्या या टिप्पणीवर त्रिशा हसली, नक्कीच देईन असं तिने सांगितलं. त्यानंतर तिने तिचं डोकं खाली झुकवलं व फोनमध्ये ती काहीतरी पाहत होती. यावेळी त्रिशाच्या चेहऱ्यावर लाजल्याचे भाव होते.

10 मे रोजी थलपती विजय यांचा शपथविधी झाला. त्या कार्यक्रमाला त्रिशा कृष्णन हजर होती. यावेळी सुद्धा तिच्या उपस्थितीने सर्वांच लक्ष वेधून घेतलेलं. विजयच्या कुटुंबियांना भेटतानाचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले.