AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : ‘गोल्ड’न चान्स ! सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, पुन्हा घसरले सोन्याचे भाव

Gold Price Today 08 July 2026 Latest News Updates in Marathi : मंदावलेली मागणी आणि डॉलरचे बळकटीकरण याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून आला आहे. आज देशभरातील प्रनुख शहरात 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती किती ते जाणून घेऊया..

Gold Price Today : ‘गोल्ड’न चान्स ! सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज,  पुन्हा घसरले सोन्याचे भाव
8 जुलै रोजी सोन्याचे दर किती ?
| Updated on: Jul 08, 2026 | 9:18 AM
Share

Gold Rate Today in India : मागणीत आलेली मंदी आणि डॉलरची वाढती ताकद यामुळे व्याज न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींवर सलग तिसऱ्या दिवशी दबाव कायम आहे. त्यातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्यातील बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याने सोन्याच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. दिल्लीमध्ये एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात एकूण 1,480रुपयांची  तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,360 रुपयांची घट झाली आहे. आजही दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे ₹10 ची किरकोळ घसरण नोंदवली गेली.

तर औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी झाल्याचा परिणाम चांदीच्या किमतींवरही झाला आहे. एक दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात प्रति किलो ₹100 ची घसरण झाली आहे.

देशातील 10 प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये 18, 22 आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर आज किंचित कमी झाले असून, ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांचेही लक्ष बाजारातील पुढील घडामोडींवर केंद्रित आहे.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर
दिल्ली ₹1,45,400 ₹1,33,290 ₹1,09,080
मुंबई ₹1,45,250 ₹1,33,140 ₹1,08,930
कोलकाता ₹1,45,250 ₹1,33,140 ₹1,08,930
चेन्नई ₹1,46,170 ₹1,33,990 ₹1,11,990
बंगळुरू ₹1,45,250 ₹1,33,140 ₹1,08,930
हैदराबाद ₹1,45,250 ₹1,33,140 ₹1,08,930
लखनऊ ₹1,45,400 ₹1,33,290 ₹1,09,080
पाटणा ₹1,45,300 ₹1,33,190 ₹1,08,980
जयपुर ₹1,45,400 ₹1,33,290 ₹1,09,080
अहमदाबाद ₹1,45,300 ₹1,33,190 ₹1,08,980

चांदीही झाली स्वस्त

यापूर्वी 6 जुलै रोजी सलग दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या किमतींमध्ये तब्बल 5,000 रुपये प्रति किलोची घट झाली होती. आज दिल्लीमध्ये चांदीचा दर 100 रुपयांनी कमी होऊन 2,44,800 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर 2,44,900 प्रति किलो असून चेन्नईमध्ये तो 2,49,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये सर्वाधिक दर चेन्नईमध्ये आहेत.

पुढे काय होऊ शकतं ?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी विभागातील वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या जून बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल सोन्याच्या किमतींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

मिरे ॲसेट शेअरखानचे कमोडिटीज प्रमुख प्रवीण सिंह यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या किरकोळ वाढीमुळे आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्डच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अल्पावधीत सोने आणि चांदीचे दर मर्यादित श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यास सोने आणि चांदीच्या किमतींना पुन्हा सकारात्मक आधार मिळू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा