जय-पराजय बाजूला, कांचन कुल यांची बैलगाडीतून रपेट
सध्या पराभव विसरुन कांचन कुल वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. कांचन कुल यांचा बैलगाडीवर बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सुरुवातील जोरदार फाईट दिली. स्वत: शरद पवारांना सुप्रियांसाठी अनेक सभा घ्याव्या लागल्या. कांचन कुल यांनी फाईट दिली असली, तरी बारामतीचा गड पवारांनी कायम राखला. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी तब्बल 1 लाख 55 हजार मतांनी पराभव केला.




