
बिग बॉस सीजन 18 धमाका करताना दिसत आहे. सलमान खान याने नुकताच बिग बॉसचा विकेंडचा वार होस्ट केलाय. सलमान खान विकेंडच्या वारला दिसणार नसल्याची चर्चा होती.

विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा ऋतिक रोशनचा जिगरी मित्र अरफीन खान याच्यावर जोरदार भडकताना दिसतोय. सलमानचा पारा चांगलाच चढलाय.

अरफीन याचे बोलणे ऐकून सलमान खान संतापला. सलमान खान याला जीवे मारण्याचा धमक्या मिळत असतानाही सलमान खानने बिग बॉसला होस्ट केले.

सलमान खान

सलमान खान हा बिग बॉस 18 ला होस्ट करणार नसल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यानंतर सलमान खानने बिग बॉसचा प्रोमो शूट केला होता.