
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मोठा काळ गाजवलाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरले. शाहरुख खानचे चित्रपट धमाका करताना दिसले. शाहरुख खान आणि कपिल शर्मा हे खूप चांगलेच मित्र आहेत.

शाहरुख खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये दाखल झाला होता. यावेळी शाहरुख खान याने नवीन स्टारबद्दल असे काही बोलले की, त्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

शाहरुखच्या दाढीच्या लुकबद्दल कपिल शर्मा म्हणाला होता की, आजकालच्या नवीन स्टार बॉईजचा लूक पाहून तू ते स्वीकारले नाही का? दाढी तुला अधिक चांगली दिसली असती की, तू त्यांनाच फॉलो करतो?.

यावेळी कपिल शर्मा हा शाहरुखची मजा घेताना दिसला. मग काय शाहरुख खान थेट म्हणाला की, कपिल तेव्हा दाढी असलेले हे अभिनेते जन्मालाही आले नसतील जेंव्हा मला दाढी येत होती.

शाहरुख खान याचे बोलणे ऐकून सर्वजण हसण्यास लागतात. शाहरुख खान आणि कपिल शर्मा हे दोघे खूप जास्त चांगले मित्र आहेत. शाहरुख खान मोठ्या संपत्तीचा मालक आहे.