
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आणि गुड न्यूज शेअर केली.

आता डिलीवरीला एक महिना बाकी असतानाच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे थेट मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले आहेत. यावेळीचे फोटो व्हायरल होत आहेत.

यावेळी दीपिका पादुकोण ही बनारसी साडीमध्ये पोहोचली. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांचाही लूक जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे चप्पल न घालता दीपिका मंदिरात पोहोचली.

एक वेगळाच ग्लो दीपिका पादुकोण हिच्या चेहऱ्यावर दिसतोय. यावेळी रणवीर सिंह याने पत्नी दीपिकाचा हात पकडल्याचे देखील बघायला मिळाले. गणपती बाप्पाचा आर्शिवाद यावेळी दोघांनी घेतला.

दीपिका पादुकोण ही जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याचेही सांगितले जातंय. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बाळाच्या जन्मानंतर नवीन घरात शिफ्ट होणार आहेत, जे अत्यंत आलिशान घर आहे.