
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची खास लव्ह स्टोरी आहे.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये जया बच्चन यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही परत कधी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

यावर जया बच्चन यांनी म्हटले होते की, आमच्या घरात तीन लेकर आहेत आणि त्या तिघांना मला सांभाळावे लागते. मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, तीन कोण?

यावर बाजूला बसलेले अमिताभ बच्चन हे म्हणाले की, श्वेता, अभिषेक आणि मी...यानंतर अमिताभ बच्चन यांच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

अमिताभ बच्चन हे सध्या काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय दिसतात.