
मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय.

ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्यापासून मलायका ही विदेशात जास्त वेळ घालवताना दिसत आहे. सतत ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

नुकताच आता मलायका ही मुंबईमध्ये स्पॉट झालीये. यावेळी मलायका ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. मलायकाचा आऊटफिटही लोकांना आवडलाय.

मलायका अरोरा ही फोटोसाठी पोज देताना देखील दिसत आहे. मलायकाचे हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

मलायका अरोरा हिच्या या फोटोवर चाहते हे कमेंट करताना देखील दिसत आहेत. मलायकाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.