
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर... मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

आताही अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने खास फोटो शेअर केलेत. पुण्यातील भाजी मंडईत मधुराणीने खास फोटोशूट केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली... ह्या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे..., असं म्हणत मधुराणी फोटो शेअर केलेत.

पुण्यातील भाजी मंडई... माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण. तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग! सकाळ-सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील, असंही मधुराणी म्हणाली.

तुझ्या वयाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे बहुतेक! दिवसेंदिवस तू तरूण दिसत आहेस. खूपच सुंदर... तुला अजून बराच काही करायचंय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी मधुराणीच्या फोटोंवर कमेंट केलीय.