
आतिफ असलम हा पाकिस्तानामधील एक प्रसिद्ध सिंगर आहे. मात्र तो पाकिस्तानातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. भारतातही आतिफ असलमची गाणी प्रचंड हिट होतात त्याचे भारतीय चाहते त्याच्या गाण्यांची आतुर्तेनं वाट पाहत असतात.

आतिफ जेव्हा या इंडस्ट्रीत आला तेव्हा लाखो मुलींचा त्याच्यावर क्रश होता. मुलींना तो अजूनही प्रचंड आवडतो. मात्र त्याचं प्रेम सारा भवनावर आहे.

2013 मध्ये दोघांनी निकाह केला. महत्त्वाचं म्हणजे आतिफ असलमची पत्नी साराला पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. कारण ती दिसायला प्रचंड सुंदर आहे. तिच्या सौंदर्यावर लोक वेडे झाले.

आतिफनं लग्नापूर्वी साराला 7 वर्षे डेट केलं आहे. फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की सारा किती ग्लॅमरस आणि सुंदर आहे.

एकदा एका मुलाखतीत आतिफनं स्वत:साठी खूप भाग्यवान असल्याचं म्हटलं होतं. आतिफ आणि साराला दोन मुलं आहेत ज्यांच्याबरोबर ते आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत.

आतिफ असलमविषयी बोलायचं झालं तर त्यानं 2005 मध्ये 'वो लम्हे' हे गाणं गायलं होतं, या गाण्यामुळे त्याला एका रात्रीत लोकप्रियता मिळाली. या गाण्यासाठी त्याला आयफा पुरस्कारही मिळाला होता.

12 मार्च 1983 रोजी पाकिस्तानच्या वजीराबाद येथे जन्मलेला आतिफ 38 वर्षांचा आहे. यू प्यार कर, पहली नजर में कैसा जादू कर दिया, तू जाने ना, तेरे संग यारा, जिना जिना कैसे जिना, दिल दिया गलना, पिया ओ रे पिया ही आतिफ असलमची काही प्रसिद्ध हिंदी गाणी आहेत.