
अभिनेत्री किआरा आडवाणी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत किआरा हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आज किआरा आडवाणी हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी किआरा रॉयल आयुष्य जगत आहे.

किआरा हिच्या नेटवर्थ बद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 3 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 22 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

किआरा महिन्याला सुमारे 25 लाख रुपये कमावते. तर अभिनेत्री वर्षाला 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते, किआरा हिच्याकडे आलिशान घर देखील आहे.

मुंबईतील प्लॅनेट गोदरेज स्कायस्क्रॅपरमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये किआरा तिच्या कुटुंबासह राहते. त्यांच्या अपार्टमेंटची किंमत 15 कोटी रुपये आहे.

किआरा हिच्याकडे आलिशान गाड्या देखील आहेत. अभिनेत्रीकडे BMW X5 आहे कारची किंमत 80 लाख रुपये आहे. याशिवाय 74 लाखांची BMW 530D, 60 लाखांची मर्सिडीज बेंझ आहे.