
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने आता देखील स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

खास अंदाजात फोटोशूट करत अभिनेत्रीने फोटोसोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्येकॉफी ब्रेकसाठी कोणत्या कारणाची गरज नाही... असं लिहिलं आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील तिचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची. आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे.