
डान्सर गौतमी पाटील... तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आताही एका पोस्टमुळे गौतमीची प्रचंड चर्चा होतेय. सोशल मीडियावर गौतमीने एक पोस्ट शेअर केलीय.

इन्स्टाग्रामवर गौतमीने एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्राचे आभार मानलेत. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार, असं गौतमी म्हणाली आहे.

नुकतंच गौतमीचा वाढदिवस झाला. या निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपलं प्रेम हेच माझ्या जीवनाचं बळ आहे. आपण अनेक माध्यमातून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपलं प्रेम, आपुलकी साथ अशीच सदैव राहावी, थोरामोठ्यांचे आशिर्वाद पाठिशी राहावेत. सगळ्यांचे आभार, अशी पोस्ट गौतमीने शेअर केलीय.

गौतमीचा महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. तिचा डान्स महाराष्ट्रातील रसिकांना आवडतो. गौतमीच्या कार्यक्रमांना तोबा गर्दी होते. गौतमी वेगवगळ्या कारणाने चर्चेत असते.