
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आई झाल्यानंतर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

दीपिका हिने एक फोटो पोस्ट केले आहे, ज्यामध्ये 'मुलीचं स्वागत आहे...' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. पण कमेंट सेक्शन बंद ठेवलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसी जाहीर केल्यापासून दीपिका तिच्या विविध प्रोजेक्ट्समध्येही सक्रिय आहे. प्रग्नेंसीमध्ये दीपिकाने अनेक फोटोशूट देखील केले होते.

दीपिका - रणवीर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. रणवीर आणि दीपिकाने नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्न केलं होतं.

दीपिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील दीपिकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.