
नुकतंच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी केपटाऊनमधून भारतात परतली आहे. आता भारतात आल्यावर तिनं सुंदर फोटोशूट केलं आहे.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. सोबतच या फोटोला सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ‘'इश्क़ में हूँ' या 'मैं इश्क़ हूँ'?...’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे (Divyanka Tripathi) चाहते जगभरात पसरलेले आहेत. स्टार प्लसचा टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मधून या अभिनेत्रीने कमावलेली प्रसिद्धी अद्याप तसूभरही कमी झालेली नाही.

दिव्यांका त्रिपाठीची हे फोटो तिच्या चाहत्यांना पसंतीस उतरले आहेत. दिव्यांका त्रिपाठीची हॅपी स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

गेले अनेक दिवस दिव्यांका सोशल मीडियावर केप टाऊनमधील गमती जमती शेअर करत होती. आता ती भारतात परतली आहे.