
जुही चावला आणि शाहरुख खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा हिट चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत.

जुही चावला आणि शाहरुख खान यांच्यामध्ये खास बाँडिंग देखील आहे. शाहरुख खान याच्या वाईट काळामध्ये जुही चावला त्याच्यासोबत खंबीरपणे उभा होती.

शाहरुख खान याच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली होती.

या वाईट काळ्यात जुही चावला ही शाहरुख खान याच्या कुटुंबियांसोबत उभी होती. यावर बोलताना चुही चावला म्हणाली की, आम्हाला नव्हते माहिती की, असे काही होणार आहे. पण हे सर्व एका क्षणापर्यंत खाली आले जेव्हा मी मदत करू शकले.

पुढे जुही चावला म्हणाली की, मला वाटले की माझ्यासाठी हे करणे योग्य आहे. आर्यन खान याला जामिन मिळवण्यासाठी जुही चावला मुंबई सत्र न्यायालयात हजर होती, जिथे तिने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर स्वाक्षरी केली आणि आर्यनचा जामीन मिळवला.