
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नेहा सरगम हिच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामागे देखील खास कारण आहे. नेहा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये नेहा जगजीत सिंग यांचं 'प्यार का पहला खत' गाणं गाताना दिसत आहे. चाहत्यांनी अभिनेत्री गाणं प्रचंड आवडलं आहे.

सांगायचं झालं तर, नेहा हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्रीला चाहत्यांनी सलोनी भाभी म्हणून डोक्यावर घेतलं.

'मिर्झापूर' सीरिजमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्रीच्या पुढच्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत असतात.

नेहा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.