
अभिय क्षेत्रात आपलं नाव व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कष्टही घेतले जातात. काहींना यश मिळतं तर काहींना नाही. पण या झगमगत्या दुनियेपासून कोसो दूर असलेला एक व्यक्ती आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

रस्त्यावर शेंगदाणे विकणारा व्यक्ती आज बॉलिवूडचा स्टार आहे. या अभिनेत्याला एका व्यक्तीनं विचारलं की, तू मॉडेलिंग करणार का? त्यावर पैसे मिळतील का? असं त्या तरूणाने प्रतिप्रश्न विचारला. तेव्हापासून सुरु झाला एका अभिनेत्याचा प्रवास...

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेते जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील नावजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत.

जॅकी श्रॉफ यांचं बॉलिवूडमध्ये आज नाव आहे. परंतू त्यांचा सुरुवातीचा काळ प्रचंड स्ट्रगलचा राहिला. ते एका चाळीत राहात होते. यावेळी पैशांची प्रचंड चणचण होती. तेव्हा जॅकी रस्त्यावर शेंगदाणे विकत असत.

जॅकी यांचा एक सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला. मस्त मे रहने का या सिनेमात नीना गुप्ता यांच्यासोबत जॅकी यांनी काम केलं. त्यांच्या या सिनेमाला सिनेरसिकांचं प्रेम मिळतंय.