
शिखर पहाडिया याच्यासोबत जान्हवीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. एवढंच नाहीतर, दोघे एकत्र देवदर्शनासाठी देखील जात असतात. शिखर याच्याबद्दल जान्हवी बोलताना देखील दिसते.

गेल्या अनेक वर्षांपासून जान्हवी शिखर याला डेट करत आहे. पण मध्यंतरी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तेव्हा जान्हवी हिच्या नावाची चर्चा इतर सेलिब्रिटींसोबत झाली होती. शिखर याच्याआधी जान्हवी तीन सेलिब्रिटींना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

जान्हवीचं नाव अक्षत रंजन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघे शाळेत एकत्र होते. जान्हवीच्या 21 व्या वाढदिवशी अक्षत रंजन याने जान्हवीसोबत एक फोटो पोस्ट करत 'आय लव्ह यू...' असं लिहिलं होतं...

अभिनेता ईशान खट्टर याच्यासोबत देखील जान्हवी हिचं नाव जोडण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत... असा खुलासा अभिनेत्रीने केला.

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी एकदा नव्या वर्षाचं स्वगत गोव्यात केलं होतं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशात दोघांच्या नात्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही...