
'कुछ कुछ होता है' सिनेमात सलमान खान आणि काजोल यांचं लग्न होणार होतं. पण अखेर सलमान स्वतः काजोल आणि अभिनेता शाहरुख खान यांचं लग्न लावून देतो..

'हम दिल दे चुके' सिनेमात देखील सलमान खानला त्याचं प्रेम भेटत नाही. सिनेमाच्या शेवटी सलमान स्वतः ऐश्वर्या हिला अभिनेता अजय देवगन याच्याकडे पुन्हा जायला सांगतो...

'साजन' सिनेमात देखील सलमान, माधुरी दीक्षितवर प्रचंड प्रेम करतो. पण सिनेमाच्या शेवटी सलमान खान स्वतः माधुरी दीक्षित आणि संजय दत्त दोघांना एकत्र आणतो...

'मैंने प्यार क्यों किया' सिनेमात देखील प्रेमाच्या प्रकरणात फेल होते. सिनेमात देखील सलमान खान याला त्याचं प्रेम मिळत नाही. सिनेमा प्रचंड गाजला होता.

'सिर्फ तुम' सिनेमात देखील सलमान खान याला त्याचं प्रेम भेटत नाही... अखेर सलमान खान म्हणतो 'माझ्यासोबतच असं का होतं...'. खासगी आयुष्यात देखील सलमान खान एकटाच आहे.