PHOTO | पब्लिक वायफाय वापरताय? सावधान ! हॅकर्सकडून मोठ्या उचापत्या
बऱ्याचदा मोबाईलवर फ्री वायफाय सुविधेचा फायदा घेताना आपण एक बाब विसरतो की, त्याचा अॅक्सेस दुसरा कुणीही घेऊ शकतो (cyber security threat on public free wifi hotspot hackers steal financial information).

बऱ्याचदा मोबाईलवर फ्री वायफाय सुविधेचा फायदा घेताना आपण एक बाब विसरतो की, त्याचा अॅक्सेस दुसरा कुणीही घेऊ शकतो (cyber security threat on public free wifi hotspot hackers steal financial information).
- फिशिंग किंवा विशिंगच्या नावाने आरोपी ऑनलाईन बँकिंग डेटिल. यूजरनेम आणि पासवर्ड मिळवतात. त्यानंतर ते कोणत्याही एका बँकेचे सदस्य सांगून ओटीपी विचारतात. त्यांच्या गोड बोलण्यात जे बळी ठरतात त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात.
- Govt is spying its own citizen
- इंटरनेट असो किंवा बँकिंगशी संबंधित इतर काही माहिती, या सर्व गोष्टींची माहिती चोरायची हेच हॅकर्सचं ध्येय असतं. ते याच माध्यमातून युजरच्या डेबिड किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती चोरी करतात. याबाबतची माहिती करण्यासाठी त्यांच्यासाठी इंटरनेट हे सोपे माध्यम आहे. कारण अनेक जण आज ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग करतात.
- सार्वजनिक वायफाय वापरताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा
- यापासून वाचायचं असेल तर त्यासाठी एक पर्याय आहे. घराबाहेर पडल्यानंतर कोणत्याही वायफायचा वापर करताना कोणतंही ट्रान्झॅक्सन करायचं नाही. कारण तसं केल्यास आपण ऑनलाईन लुबाडले जाण्याची दाट शक्यता असते.
- बऱ्याचदा मोबाईलवर फ्री वायफाय सुविधेचा फायदा घेताना आपण एक बाब विसरतो की, त्याचा अॅक्सेस दुसरा कुणीही घेऊ शकतो. फ्री वायफाय सुविधेचा लाभ घेताना इंटरनेट किंवा हॉटस्पॉट किती सुरक्षित आहे हे देखील आपण तपासत नाहीत. याशिवाय पब्लिक वायफाय नेटवर्कमध्ये हॅकर्स नेहमी अॅक्टिव्ह असतात. याच माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या यूजर्सची माहिती मिळते. काही हॅकर्स तर लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी फ्री हॉटस्पॉटही देतात. जे लोक या हॉटस्पॉटला लॉगिन करतात त्यांच्या मोबाईलमधील सर्व महत्त्वाची माहिती हॅकर्सकडे जाते. यामध्ये बँकेच्या पासवर्डपासून ते अनेक महत्त्वाचे संवेदनशील गोष्टींचाही समावेश आहे. या माहितीच्या आधारावर हॅकर्स युजरला नंतर ब्लॅकमेल करतात किंवा लुबाडतात.






