PHOTO | 30 नोव्हेंबरला या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या खास गोष्टी
या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर हे ग्रहण रात्री 5 वाजून 22 मिनिटांपर्यंत पाहता येईल.
या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसेल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेला दिसेल.
या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसेल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेला दिसेल.
या वेळेचं चंद्रग्रहण हे उपछाया चंद्रग्रहण आहे.
उपछाया चंद्रग्रहण म्हणजे ग्रहण सुरु होण्याआधी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. याला चंद्र मालिन्य म्हणतात. यानंतर चंद्र पृथ्वीच्या वास्तवातील सावलीत प्रवेश करतो. यावेळी खऱ्या अर्थाने ग्रहण सुरु होते.
उपछाया ग्रहणावेळी चंद्राची प्रतिमा केवळ अंधूक होते, पूर्ण काळी होत नाही. या अस्पष्टपणाला सामान्य स्थितीत पाहता येत नाही. म्हणूनच या ग्रहणाला उपछाया चंद्रग्रहण म्हटले जाते.
या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांपर्यंत पाहता येईल.
हे चंद्रग्रहण आशिया खंडातील काही देशांमध्ये दिसेल. तसेच अमेरिकेच्या काही भागातही हे चंद्रग्रहण पाहता येईल.