
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी रंगलेल्या लढतीत अखेर भाजपच्या धनंजय मुंडे मुंडे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे कोल्हापूरचेच उमेदवार संजय पवार यांचा पराभव केलाय.

या विजयानंतर कोल्हापुरात महाडिकांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. 11 जूनला पहाटे राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच कोल्हापुरात जल्लोषाला सुरुवात झाली.

विजय मिळवल्यानंतर धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांचं स्वागत केलं.

त्यावेळी धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांना खांद्यावर घेऊन समर्थकांनी गाण्यावर ठेका धरला.

महाडिक यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बऱ्याच कालावधीनंतर महाडिक कुटुंबात विजयोत्सव साजरा होत असल्यानं कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिक पर्व सुरु झाल्याची चर्चा समर्थकांमध्ये रंगली आहे.