
भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील दोन सुपरस्टार हे नात्यामध्ये एकमेकांचे भाऊ आहेत. लहानपणा पासून एकाच घरात वाढले. दोघांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. पण त्या दोघांमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीमुळे भांडण झाले. त्यानंतर जवळपास 18 वर्षे ते दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. आता हे अभिनेते कोण आहेत? ती अभिनेत्री कोण? चला जाणून घेऊया...

असे म्हटले जाते की अभिनेता अल्लू अर्जुन सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करत होता. या अभिनेत्रीचे नाव नेहा शर्मा आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिरुथा’ चित्रपटातून तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘क्रूक’ या बॉलिवूड चित्रपटातून ती प्रसिद्ध झाली. त्या काळात नेहा आणि अल्लू अर्जुन एकमेकांवर प्रेम करत होते, अशा चर्चा सुरु होत्या. असेही म्हटले जाते की, अल्लू अर्जुन तिच्याशी लग्न करणार होता.

नेहा शर्माने ‘चिरुथा’ चित्रपटात राम चरणसोबत मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नेहा आणि राम चरण एकमेकांच्या प्रेमात पडले. शिवाय, त्यांनी गुपचुप लग्न केले आणि हनिमूनसाठी गेले, अशाही अफवा पसरल्या होत्या.

या अफवांनी अल्लू अर्जुन खूप दुखावला गेला. ज्या मुलीशी त्याला लग्न करायचे होते तिच्याचसोबतच त्याचा भाऊ राम चरण रिलेशनशीपमध्ये होता. असे म्हटले जाते अल्लू अर्जुनला हे समजल्यावर तो खूप दु:खी झाला होता.

या एका घटनेमुळे राम चरण आणि अल्लू अर्जुन यांच्यातील नात्यात फूट पडली होती. ‘चिरुथा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ते जवळपास 18 वर्षांपर्यंत अल्लू अर्जुन आणि राम चरण यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले आहे, अशा अफवा पसरल्या.

जेव्हा अशा अफवा पसरल्या, तेव्हा राम चरणने यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. एका टेलिव्हिजन शोमध्ये त्याने याबाबत खुलासा केला. राम चरणने नेहा शर्मासोबतच्या लग्नाच्या बातम्या खोडून काढल्या. त्याने सांगितले की, अशा बातम्यांमुळे त्याची पत्नी उपासनासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. त्याने नेहा शर्मा आणि स्वतःबाबत पसरलेल्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.

दरम्यान, 2012 मध्ये अभिनेता राम चरणने उपासनाशी लग्न केले. दुसरीकडे, अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीवर प्रेम करून तिच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. पण, असे म्हटले जाते की, राम चरण आणि अल्लू अर्जुन एकमेकांशी फारसे बोलत नाहीत आणि कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येत नाहीत.

अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्यातील दुराव्यासाठी नेहा शर्माला जबाबदार ठरवण्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तसेच, अल्लू अर्जुन आणि राम चरण यांनी बोलणे बंद करण्याचे कारणही स्पष्ट झालेले नाही.