Raksha Bandhan: मराठी सेलिब्रिटींचं रक्षाबंधन; व्यक्त केल्या भावाबरोबरच्या अतुट नात्याविषयीच्या भावना

राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 10:10 AM
1 / 5
राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर  येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. झी मराठीवर येत असलेल्या नविन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब-चौधरी, पल्लवी पाटील आणि धनश्री कडगावकर यांनी आपल्या भावा बरोबरच्या अतुट नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदी म्हणजेच पल्लवी पाटील आपल्या भावाबरोबर असलेल्या प्रेमळ नात्याबद्दल सांगते की,  “मी माझाच भाऊ नाही तर चुलत भावांना देखील तेवढ्याच प्रेमाने राखी बांधते, आम्ही सर्व एकत्र जमलो की धम्माल करतो. लहान असताना आपल्याला कोणीतरी राखी बांधून दादा म्हणावं असं वाटायचं. ती  इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून दादा म्हणून पूर्ण करायच्या. ही माझी बालपणीची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे.”

3 / 5
अभिनेत्री दिपा परब-चौधरी ही बऱ्याच कालावधी नंतर 'तु चाल पुढं' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिपा आपल्या भावा बद्दल सांगते की "आमचं नातं खूप गोड आहे. तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, माझा भाऊ मला नेहमी माझ्या कामासाठी प्रोत्साहन देतो. माझं काम त्याला खूप आवडतं. नवीन नवीन गोष्टी तो मला सुचवतो."

4 / 5
'तु चाल पुढं' या नविन मालिकेतील शिल्पीया भूमिकेत दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हणाली की, "आम्ही लहानपणी खूप भांडायचो, मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतंच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा.

5 / 5
भाऊ आणि बहीण यांच्यातील हे सुंदर नातं साजरा करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या खास दिनानिमित्त सेलिब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.