‘समाजाचा कॉमन मॅन..’; एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील बॅनर चर्चेत
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर झालेला नाही. आता ठाण्यात लुईसवाडी इथल्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा बॅनर लावण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनरImage Credit source: Instagram
- राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय.
- ‘राहुल कनाल फाऊंडेशन’च्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि त्यासोबतच काही मजकूर लिहिलेला आहे.
- ‘भाई!!! लहानांसाठी शिंदे काका, बहिणीसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरुपात!!!’, अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आला आहे.
- राज्यात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं जाहीर केलं असलं तरी गृहमंत्रिपदाबाबत ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
- एकनाथ शिंदे





