Photos :निवडणुकीच्या मैदानात नातेवाईक आमनेसामने, कुठं साडूंची तर कुठं सासरे-सुनाची टक्कर
बिहार विधानसभा निवडणुकीत बाहुबलींसोबतच घराणेशाहीचाही जोर पाहायला मिळतोय. जवळपास सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिसतोय. हे नातेवाईक या ना त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी तर हे नातेवाईक एकमेकांच्या विरुद्ध असल्याचंही दिसतंय.

बिहार विधानसभा निवडणुकीत बाहुबलींसोबतच घराणेशाहीचाही जोर पाहायला मिळतोय. जवळपास सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव दिसतोय. हे नातेवाईक या ना त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी तर हे नातेवाईक एकमेकांच्या विरुद्ध असल्याचंही दिसतंय.
- जीतन राम मांझी यांचे जावई देवेंद्र मांझी देखील हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या तिकिटावर मखदुमपूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
- माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) या पक्षातून त्यांचे अनेक नातेवाईक निवडणूक रिंगणात आहेत. जीतन राम स्वतः इमामगंज मतदारसंघातून उभे आहेत. दुसरीकडे त्यांची नातेवाईक ज्योती देवी बाराचट्टी मतदारसंघातून उभ्या आहेत.
- आधी राजदमध्ये असलेले दिग्गज नेते चंद्रिका राय यावेळी जनता दल युनायटेडमधून निवडणूक मैदानात आहेत. दुसरीकडे त्यांचे जावई तेज प्रताप यादव हसनपूर मतदारसंघातून उभे आहेत.
- जेडीयूचे वरिष्ठ नेते नरेंद्र नारायण यादव मधेपुरा मतदारसंघातून, तर त्यांचे जावई निखिल मंडल जेडीयूच्याच तिकिटावर आलमनगर मतदारसंघातून उभे आहेत.
- जनता दल युनायटेडने यावेळी एका जोडप्यालाच तिकिट दिलंय. कौशल यादव जेडीयूच्या तिकिटावर नवादा येथून तर त्यांची पत्नी पूर्णिमा देवी गोविंदपूर मतदारसंघातून निवडणूक मैदानात आहेत.
- जनता दल युनायटेडने सुनील कुमार यांना ओबरा मतदारसंघाचं तिकिट दिलंय, तर त्यांचे भाऊ भीम कुमार सिंह यांना गोह मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
- सिवान मतदारसंघात लढत वेगळी असणार आहे. या मतदारसंघातून भाजपने ओम प्रकाश यादव यांना तिकिट दिलंय, तर राजदने अवध बिहारी चौधरी यांना तिकिट दिलंय. दोघे एकमेकांचे साडू आहेत.
- पती-पत्नीशिवाय या निवडणुकीत सासरे आणि सुनेमध्ये देखील लढत होत आहे. संदेश विधानसभा मतदारसंघातून जेडीयूच्या तिकिटावर बिजेंद्र यादव आणि राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर किरण देवी निवडणूक लढत आहेत. दोघांमध्ये सासरे आणि सून असं नात आहे.
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले बाहुबली नेते आनंद सिंह यांची पत्नी लवली सिंह आणि मुलगा चेतन आनंद दोघेही निवडणूक लढत आहेत. दोघेही राजच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत.









