Girija Oak Mother: गिरिजा ओकच्या वडिलांना सगळेच ओळखतात, पण आई आहे तरी कोण?

Girija Oak Mother:गेल्या काही दिवसांपासून गिरिजा ओक ही चांगलीच चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. आता गिरिजाची आई कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 6:55 PM
1 / 6
मराठी सिनेमाची नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या साध्या स्वभावाने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहते प्रेमात पडले आहेत. गिरिजाच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच तिचे खरे आयुष्यही प्रेक्षकांना आवडते आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वैयक्तिक जीवनाचे वेगवेगळे पैलू समोर आले आहेत.

2 / 6
अभिनयाची प्रेरणा गिरिजाला घरातूनच मिळाली. ती ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरिश ओक यांची कन्या आहे. तरीही गिरिजाने स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या वडिलांचे योगदान तर सर्वांनाच माहिती आहे, पण तिच्या यशात आणि जीवनात तिच्या आईची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे.

3 / 6
गिरिजा ओकची आई म्हणजे पद्मश्री फाटक. गिरिजा ही गिरिश ओक आणि पद्मश्री ओक यांची मुलगी आहे. गिरिश ओक यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पद्मश्री यांनी संजय फाटक यांच्याशी दुसरे लग्न केले.

4 / 6
नुकत्याच एका मुलाखतीत गिरिजा आणि तिच्या आईने एकत्र सहभाग घेतला होता. त्या मुलाखतीत पहिल्यांदाच पद्मश्री फाटक यांच्या कार्याची माहिती समोर आली. गिरिजाच्या म्हणण्यानुसार, तिची आई गेली अनेक वर्षे राष्ट्र सेविका समिती (महिला विभाग) या संघटनेत सक्रिय आहेत. त्यांनी बरेच वर्षे नोकरीही केली आहे आणि संस्कारवर्गही घेतले आहेत.

5 / 6
पद्मश्री फाटक यांनी स्वतः सांगितले, “राष्ट्र सेविका समितीला २०२६ मध्ये ९० वर्षे पूर्ण होत आहेत. मी लहानपणापासूनच या संस्थेसाठी काम करत आहे. आम्ही देशभर शिबिरे आयोजित करतो. महिलांमध्ये मातृशक्तीचा जागर करतो. त्यांना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतो.”

6 / 6
गिरिजाच्या यशात वडिलांच्या अभिनयाचा वारसा तर आहेच, पण आईकडून मिळालेल्या संस्कारांचा आणि सामाजिक कार्याची प्रेरणा देखील तितकीच महत्त्वाची आहे.