मोर किती वर्षे जगतो? उत्तर जाणून आश्चर्य वाटेल;स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही
मोर हा पक्षी सर्वांचाच आवडता. त्याचा फुललेला पिसारा आणि मनमोहक नृत्या पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला त्यांच्याबाबतीतील एक गोष्ट माहित आहे का? की, वन्य मोरांचे आयुष्य किती असते? किंवा ते किती वर्ष जगतात हे बऱ्याच जणांना माहित नसेल. याचं उत्तर जाणून नक्कीच तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

peacock lifespanImage Credit source: tv9 marathi
- मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करते. त्याचा सुंदर पिसारा, मनमोहक नृत्य आणि त्याचा मधुर आवाज त्याला खास बनवते. पण तुम्हाला माहिती आहे का हा सुंदर पक्षी किती काळ जगतो?
- असे म्हटले जाते की निरोगी मोर साधारणपणे 20 ते 25 वर्षे जगू शकतो. हे त्याच्या काळजी आणि वातावरणावर अवलंबून असते.
- वन्य भागात राहणारे मोर सुमारे 15 ते 20 वर्षे जगतात, कारण त्यांना हवामान आणि भक्षकांपासून धोका असतो.
- पाळीव असणाऱ्या मोरांचे आयुष्य थोडे जास्त असते. योग्य अन्न आणि संरक्षण, काळजीमुळे ते 25 वर्षे किंवा त्याहून अधिक जगू शकतात.
- मोराला भारतात राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा आहे आणि तो राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक भागात आढळतो. मोर धान्य, फळे, कीटक आणि लहान प्राणी खातात. चांगला आहार त्यांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य सुधारतो.
- मोरांसाठी खूप थंड किंवा उष्ण हवामान हानिकारक असू शकते. त्यांच्यासाठी मध्यम आणि हिरवेगार वातावरण सर्वोत्तम आहे.मोराला स्वच्छ वातावरण आणि नियमित लसीकरण मिळाले तर तो बराच काळ निरोगी राहतो.
- मोराचे आयुष्य त्यांची योग्य काळजी, आहार आणि वातावरणावर अवलंबून असते. योग्य परिस्थितीत मोर हे निरोगी आणि 25 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपर्यंत जगू शकतो.
