काय सांगता, मानवी शुक्राणूंनी न्यूटनचा तिसरा नियम मोडला; नवीन संशोधन वाचले का?
Human Sperm challenges Newton third law : न्यूटनच्या तिसर्या नियमाला मानवी शुक्राणूने आव्हान दिले आहे. त्यामुळे विज्ञान विश्वाला धक्का बसला आहे. काय आहे न्यूटनचा नियम आणि शुक्राणू कसा तोडतो तो नियम?

शुक्राणूंनी न्यूटनचा तिसरा नियम तोडलाImage Credit source: गुगल
- Human Sperm , मानवी शुक्राणूंनी न्यूटनचा तिसरा नियम तोडला आहे. नवीन संशोधनातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे विज्ञान जगतात हा कौतुकाचाच नाही तर सखोल संशोधनाचा विषय ठरला आहे.
- न्यूटनच्या तिसर्या नियमानुसार, प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. न्यूटनचा हा नियम प्रसिद्ध आहे. त्यानुसार जगातील अनेक क्रिया घडतात. पण मानवी शुक्राणूंनी या नियमावर मात केली आहे.
- पण नवीन संशोधनानुसार, न्यूटनच्या तिसर्या नियमावर शुक्राणू मात करतात. नवीन संशोधनातील दाव्यानुसार, शुक्राणू तिसरा नियम तोडतात आणि पुढे जातात.
- क्योटो विद्यापीठातील वैज्ञानिक केंटा इशिमोटो (Kenta Ishimoto) यांच्या नेतृत्वात केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. PRX Life या प्रसिद्ध संशोधन पुत्रिकेत त्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- या संशोधनानुसार, शुक्राणू ज्या प्रमाणे तरंगतात ते पारंपारिक भौतिक सिद्धांतांशी मेळ खात नाहीत. महिला प्रजनन प्रणालीसारख्या अत्यंत चिकट स्थितीत पारंपारिक गती तंत्र काम करत नाही. येथे न्यूटनचा नियम लागू होत नाही. अशा कठीण स्थितीत शुक्राणू एक विशिष्ट प्रकारची लय आणि गतीने पुढे सरकतात.
- ऑड इलास्टिसिटी, आंतरिक ऊर्जेमुळे शुक्राणू एका विशिष्ट लयीत आणि गतीने पुढे सरकतात, असा दावा या संशोधनात करण्यात आला. या क्रियेत समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया घडत नाही.






