इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, संपूर्ण जगाचं इंटरनेट ठप्प होणार? भारतालाही जबर धक्का!
इराण आता आणखी धक्कादायक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीत पाण्याखाली असलेल्या इटरनेट केबलला इराण लक्ष्य करू शकते. असे झाल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचे युद्ध संपवण्यावर एकमत न झाल्यास अमेरिका आणखी आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. दुसरीकडे इराणदेखील मागे हटण्यास तयार नाही.

अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी जलव्यापारासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. दरम्यान, इराणच्या भूमिकेमुळे जागतिक व्यापार साखळी संकटात सापडलेली असताना आता इराणने जगाला आणखी एक धक्का दिला आहे.

इराणने संपूर्ण जगाला मोठा इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पाण्याखाली असलेल्या इंटरनेट फायबर केबलला आम्ही आता लक्ष्य करू, असं इराणच्या आयआरजीसीने म्हणजेच लष्कराने म्हटलं आहे. इराणच्या या धमकीने भारताच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इराणने समुद्राच्या पाण्यात असलेल्या इंटरनेट केबलला लक्ष्य केलं तर त्याचा परिणाम भारत, युरोप, आशिया आणि आफ्रेकेतील अनेक देशांवर पडू शकतो. भारतातील इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकते.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या इंटरनेट केबलला लक्ष्य केलं तर जागतिक पातळीवर इंटरनेट कनेक्शनचं मोठं संकट उभं राहू शकतं. यामुळे भारतासह इतरही अनेक देशांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता नेमकं काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.