Ladki Bahin Yojana Update: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना सरकारकडून गोड भेट, इतका मिळाला ऑगस्टचा हप्ता

Ladki Bahin Yojana Update: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना सरकारकडून गोड भेट मिळाली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे. ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगायचं झालं तर, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 339 कोटी रुपये वितरित केल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिलेली.

| Updated on: Oct 02, 2026 | 12:27 PM
1 / 5
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरली. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्याता जमा झाला आहे.

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरली. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्याता जमा झाला आहे.

2 / 5

रक्षाबंधन आधी जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला, त्यानंतर नवरात्री आधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. पण अद्याप सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण नवरात्री हप्ता जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

3 / 5

मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितल्यानुसार, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने आवश्यक निधीची व्यवस्था केली. हप्त्यासाठी तब्बल 339 कोटी रुपये वितरित केले होते. शासनाने निर्णय दिल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले.

4 / 5

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्टचा हप्ता मिळण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

5 / 5

ऑगस्टचा हप्ता मिळण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या. शासन निर्णय जारी झाल्याने आणि निधी वितरित झाल्याने आता लाभार्थ्यांना रक्कम मिळाली आहे. आता महिलांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले ती नाही, ते तपासून पाहवं किंवा मोबाईलवर मेसेज आली की नाही... यावर त्यांना खात्री करता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us