AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dino Morea: मोठी बातमी! दिनो मोरियाला होणार अटक? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू; नेमकं प्रकरण काय?

अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमिततेप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण काय, ते जाणून घ्या..

Dino Morea: मोठी बातमी! दिनो मोरियाला होणार अटक? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता डिनो मोरियाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2026 | 1:36 PM
Share

Dino Morea: मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापर प्रकरणात अभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी त्याची याआधी मुंबई पोलिसांकडून चौकशीसुद्धा करण्यात आली होती. दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना काही कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं होतं. दिनो मोरिया हा शिवसेना (ठाकरे गट) युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.

मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने याआधी 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यात मुंबई आणि केरळमधील कोची इथल्या ठिकाणांचा समावेश होता. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी केतन कदम आणि दिनो मोरिया यांच्यात 2019 आणि 2022 या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार आहेत. त्याबाबतही आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.

दिनो मोरियाचं नाव कसं आलं?

या प्रकरणातील आरोपी केतन कदम याच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी करताना दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅंटिनो यांच्याशी त्याचा संपर्क असल्याचं तपासात आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दिनो मोरियाची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली आणि त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. नंतर या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानेही दिनो आणि सॅंटिनो यांना समन्स बजावलं. जून 2025 मध्ये दिनोच्या मुंबईतील घरावरही ईडीने छापेमारी केली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 18 कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. त्यापैकी अनेकांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पालिकेचे 65 कोटी 54 लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ईडीनेही उडी घेतली आहे.

मिठी नदी मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याच्या व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. या नदीची लांबी सुमारे 17.8 किलोमीटर असून विहार आणि पवई तलावांच्या ओव्हरफ्लोमधून तिचा उगम होतो. पुढे ती माहिम खाडीमध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे मुंबईच्या पावसाळ्यात या नदीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. 2005 मध्ये मुंबईत आलेल्या भीषण पुरानंतर मिठी नदीकडे विशेष लक्ष देण्यात आलं. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचणारा गाळ, कचरा आणि प्रदूषण यामुळे तिची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होत असल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. त्यामुळे नदीतील गाळ काढण्याचं काम महापालिकेकडून केलं जातं.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद