Kota Accident: 36 नातेवाईक, 3 गाड्या! देवदर्शनाहून परतताना धुळ्यातील 9 जणांचा राजस्थानमध्ये मृत्यू, नेमकं काय घडलं? नातेवाईकांनी सांगितला
Rajasthan Kota Accident: राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर अपघात झाला. या अपघतात महाराष्ट्रातील धुळे शहरातील ९ लोक जागीच ठार झाले.

Rajashthan Kota Accident Update: देवदर्शन घेऊन ३६ नातेवाईक तीन गाड्यांमधून घरी परतायला निघाले होते. प्रवासादरम्यान दोन गाड्या मागे राहिल्या होत्या आणि एक गाडी पुढे निघून गेली. मात्र हीच पुढची गाडीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्री १६ प्रवाशांनी भरलेल्या गाडीचा अपघात झाला. ही गाडी उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडकली आणि होत्याचे नव्हते झाले. या भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी अंत झाला. इतर प्रवासीही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब हे धुळे शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ प्रवांशाच्या क्रूझरने रस्त्याच्या शेजारी असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात क्रूझरचा एका क्षणात चक्काचूर झाला. क्रूझरमधील अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांना आणि पोलिसांना प्रचंड प्रयत्न करावे लागले. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जण ठार झाल्याची माहितीही समोर आली.
#WATCH | Rajasthan | 9 people killed several injured after a vehicle carrying pilgrims rammed into a parked truck near Shambhupura on the Kota-Udaipur highway in Kota
Additional District Collector Rajesh Joshi says, “Near Shambhupura, a vehicle carrying 16 people collided with a truck in the middle of the night. It was a deeply tragic and painful accident, in which 9 people lost their lives. They were returning to Maharashtra after visiting Khatu Shyam. All of them were from the same family… Our priority right now is ensuring that the injured receive proper medical care and recover. Meanwhile, the post-mortem procedures are being carried out for those who lost their lives in the accident…”
— ANI (@ANI) November 22, 2026
या दुर्दैवी घटनेनंतर अपघातग्रस्त कुटुंबातील एका सदस्याने रात्री नेमके काय घडले, याचा थरारक अनुभव बोलून दाखवला. अपघातग्रस्त कुटुंबातील व्यक्तीचा फोन कुटुंबातील इतर व्यक्तींना मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ANI शी बोलताना पीडित नातेवाईकाने सांगितले की, “आम्ही सर्वजण ३६ नातेवाईक मिळून तीन गाड्यांमधून खाटूश्यामजींचे दर्शन घेतले होते. यानंतर आम्ही घरी परत जाण्यासाठी दिशेने परततलो. प्रवासादरम्यान आम्ही एका हॉटेलवरही थांबलेलो. यातील आमच्या दोन गाड्या मागे राहिल्या, तर अपघातग्रस्त तिसरी गाडी पुढे निघून गेलेली. तेवढ्यात बहिणीचा फोन आला की आमच्या गाडीचा अपघात झाला. ही बातमी कळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.” नातेवाईक पुढे म्हणाले की, “जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडीचा चक्काचूर झालेला दिसला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. दुसरीकडे, कोटाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (ADM) राजेश जोशी यांनी या घटनेची चौकशी केली.
