
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तेल हे आपल्या केसांसाठी एखाद्या सलाईन प्रमाणेच आहे. तेल केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. केसांना तेल लावल्याने केसांशी संबंधीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

केसांना तेल लावणे खूप चांगले मानले जाते, परंतु त्याच्याशी संबंधित चूक हानिकारक ठरू शकते. आजकाल लोक अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात. बरेचजण रात्री झोपताना केसांना तेल लावून झोपतात.

पण कधीही रात्री झोपताना केसांना तेल लावून अजिबात झोपू नका. यामुळे केसांशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्य म्हणजे आपले केस कमकुवत होतात.

रात्रभर केसांना तेल लावल्याने टाळूमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते. बेडशीटवर साचलेली माती तेलाच्या सहाय्याने केस आणि टाळूमध्ये बसते आणि कोंड्याची समस्या निर्माण होते.

रात्रभर केसांना तेल लावल्याने केस कमकुवत होतात. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक होते. याचमुळे आपल्या केसांना रात्रभर तेल लावून ठेऊ नका.

केसांना रात्रभर तेल लावून सोडणे कधीकधी महाग ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, तेलामुळे केसांमध्ये साचणारी माती केस गळण्यास कारणीभूत ठरते.

जर तुम्हाला केसांना तेल लावायचे असेल तर जास्तीत-जास्त दोन तासच केसांना तेल ठेवा. त्यापेक्षा अधिक वेळ केसांना तेल लावल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते.

काही लोकांना असेही वाटते की केसांना गरम तेलाने मसाज केल्याने झटपट केस वाढतात. मात्र, गरम तेल केसांना लावल्याने टाळूचे नुकसान देखील होते.

तेल गरम असो किंवा कोमट केसांना लावणे फायदेशीर ठरत नाही. यामुळे टाळूशी संबंधीत अनेक समस्या निर्माण होतात. जर खूपच तुमचे डोके दुखत असेल तर तेलाने केसांवर मसाज करा.

असे म्हटले जाते की जर खूप गरम तेल टाळूवर लावले तर ते खाज येण्याची समस्या वाढवू शकते. त्याऐवजी कोमट तेलाने केसांना मसाज करा आणि लगेचच केस धुवू टाका.