
जगात सर्वच ठिकाणी लग्न ही परंपरा आहे. पण लग्नाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. या परंपरांमधून त्या समाजाची आणि देशाची संस्कृती समजते. पण अनेक ठिकाणी लग्नाच्या कित्येक परंपरा अशा आहेत की समोरचा माणूस आश्चर्यचकीत होतो.

उत्तर आफ्रिकेतील पश्चिम भागात अशीच एक परंपरा आहे. या परंपरेत मुलींना लग्नासाठी वजन वाढवावं लागतं. एवढंच नव्हे तर मुलीचं वजन वाढलेलं असेल तरच तिच्याशी लग्न केलं जातं. एखादी मुलगी सडपातळ असेल तर तिला लग्नासाठी चक्क नकार मिळतो.

या मुलींना वजन वाढवण्यासाठी खास खुराकही दिली जाते. पण ज्या मुली वजन वाढवत नाही, त्यांना मात्र नवरा मिळताना मोठी मुश्किल होते. त्यांचं लग्न जुळता जुळत नाही.

आता या देशात ही परंपरा का आहे? त्याच्या मागचं कारणही समजून घ्या. उत्तर आफ्रिकेतील या देशाचं नाव मॅरिटानिया आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या देशात स्थूलता म्हणजे सौंदर्य आणि समृद्धीचं प्रतिक आहे. त्यामुळेच त्यांना जाड्या मुली अधिक आकर्षक वाटतात. जर मुली सडपातळ असतील तर त्या गरीब आणि कमनिशीबी असल्याचं या लोकांना वाटतं.

मॉरिटानियातील या परंपरेला लैबलोउ म्हटलं जातं. या वजनदार महिलाांना समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. तसेच आरोग्याचंही प्रतिक मानलं जातं.

तसेच स्थूल मुलीसोबत लग्न करण्याची ही परंपरा या देशात आहेच, पण अशा मुलींसोबत लग्न करणं ही अभिमानास्पद बाबही मानली जाते. जाड्या मुली निरोगी आणि मजबूत असतात. त्यामुळे त्या आमच्या कुटुंबाचा अभिमान असतात असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

या मुलींनी जाडं होण्यासाठी भरपूर कॅलरीज असलेलं जेवण दिलं जातं. दूध, दही, तूप, मटन, ऑलिव्ह तेल, खजूर, बकरी किंवा उंटाचं दूध दिलं जातं. हे खाल्ल्यानंतर मुलींना आराम करायला देतात. आराम झाल्यावर परत हीच खुराक खायला देतात.

पण, काळानुसार आता ही परंपराही बदलत चालली आहे. काही भागात ही परंपरा अजूनही सुरू आहे. आरोग्याच्या कारणास्तव अनेक ठिकाणी आता मुलींना नको तेवढा खुराक देणं बंद केलं जात आहे.