एक दिवस त्यांचा पत्त्याचा बंगला गायब होईल… उद्धव ठाकरे यांचा दावा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल अत्यंत मोठा दावा केला. सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून महापालिकेच्या निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. त्यापूर्वी आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. आता नुकताच उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. मनसे पक्षाची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याचे बघायला मिळाले. दोघे मिळून राज्यातील महापालिका निवडणुका लढत आहेत. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने काय धमाका होतो हे येणाऱ्या 16 जानेवारीला स्पष्ट होईलच, त्यापूर्वी ठाकरे बंधुंनी गंभीर आरोप नुकताच भाजपावर केले. मुंबई, ठाणेसह राज्यातील सर्व महापालिका आमच्या हातात येणे आवश्यक असल्याचे ठाकरे बंधूंनी म्हटले.
नुकताच मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, या वेळेला भारतीय जनता पक्षातच बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, म्हणजे जसं राज मघाशी म्हणाला तसा त्याचा पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
राज ठाकरे म्हणाले की, लहानपणी सगळे पत्त्यांचा बंगला करायचो… त्यांच्याकडे सुद्धा बघितले तर पत्त्यांचा बंगला आहे. पण तो उलटा आहे. खालचा पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. आता हे जे सगळे बोलताहेत ते केवळ नरेंद्र मोदी यांच्या जीवावर. भारतीय जनता पक्षाला आज जे मतदान होत आहे ते देखील फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावावर. यांच्या कोणाच्याही नावावर होत नाही.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, तुम्हाला सांगितले जाते की, महाराष्ट्र देशातला कोणताही माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. पण बाकींच्या राज्यात असे होते का… बाकीचे लोक त्यांच्याकडे येणारे लोढें बरोबर नियंत्रणात ठेवतात. पण आमच्याकडे आमचेच लोक सांगतात की, कोणीही कुठेही राहू शकते.
