AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी भाड्याने मिळते सुंदर पत्नी, आवडली तर करु शकता लग्न, पर्यटकांची या ठिकाणी असते प्रचंड गर्दी

असं एक ठिकाण जिथे भाड्याने मिळतात सुंदर महिला. आवडल्यास तुम्ही लग्न देखील करू शकता. या ठिकाणी परदेशातून येतात पर्यटक. कुठे आहे हे ठिकाणं?

या ठिकाणी भाड्याने मिळते सुंदर पत्नी, आवडली तर करु शकता लग्न, पर्यटकांची या ठिकाणी असते प्रचंड गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 17, 2026 | 2:07 PM
Share

सध्या लग्नासाठी मुली भेटणं फारच कठीण होत चाललं आहे. अनेक तरुण अद्याप मुली मिळत नसल्यामुळे विना लग्नाचे आहेत. मात्र, अशातच आता या तरुणांसाठी खास संधी आहे. दक्षिण-पूर्व आशियातील थायलंड हा जगातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुंदर समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि पर्यटनामुळे या देशात दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येतात. मात्र, आता थायलंडमधील ‘रेंटल वाइफ’ अर्थात भाड्याने पत्नी ठेवण्याच्या कथित प्रथेमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः पटाया परिसरातील बार आणि नाइटक्लबशी संबंधित या प्रथेबाबत एका पुस्तकात माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे.

‘रेंटल वाइफ’ला ‘वाइफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ असेही म्हटले जाते. या व्यवस्थेत काही महिला ठरावीक मोबदल्याच्या बदल्यात परदेशी पुरुषांसोबत काही काळ पत्नीप्रमाणे राहतात. हा कालावधी काही दिवसांपासून अनेक महिन्यांपर्यंत असू शकतो. मात्र, ही कायदेशीर किंवा औपचारिक लग्नाची पद्धत नसून अनौपचारिक स्वरूपाची व्यवस्था असल्याचे सांगितले जाते.

पुस्तकामुळे प्रथा चर्चेत

La Vérité Emmanuel यांच्या Thailand’s Taboo: The Rise of Wife Rental in Modern Society या पुस्तकामुळे हा विषय चर्चेत आल्याचे वृत्त आहे. या व्यवस्थेमागील सामाजिक, आर्थिक आणि भावनिक पैलूंवर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र, या प्रथेचा नेमका विस्तार आणि पुस्तकातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे महिलांची निवड?

उपलब्ध माहितीनुसार, ग्रामीण भागातून आलेल्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या काही महिला पटाया येथील बार किंवा नाइटक्लबमध्ये काम करतात. काही जणी अतिरिक्त उत्पन्नासाठी परदेशी पुरुषांसोबत अशा प्रकारच्या व्यवस्था स्वीकारतात. या व्यवस्थेतील मोबदला महिलेचे वय, शिक्षण, स्वरूप आणि ठरलेल्या कालावधीनुसार बदलत असल्याचे सांगितले जाते. मात्र, यासाठी नमूद केल्या जाणाऱ्या मोठ्या रकमेच्या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी आवश्यक आहे.

वाढत्या एकटेपणामुळे तात्पुरत्या नात्यांना पसंती?

शहरीकरण, बदलती जीवनशैली, एकटेपणा आणि परदेशी पर्यटकांची वाढती संख्या ही अशा व्यवस्थांच्या चर्चेमागील संभाव्य कारणे मानली जातात. जपान आणि दक्षिण कोरियामध्येही पैसे देऊन सोबत मिळवण्याच्या विविध सेवा अस्तित्वात आहेत. मात्र, त्या सर्व सेवा थायलंडमधील ‘रेंटल वाइफ’ प्रथेसारख्याच आहेत, असे म्हणता येत नाही.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल