Maatrubhumi सिनेमा का रखडलेला, सरकारचा काही दबाव होता का? सलमान खान स्पष्टच म्हणाला…
'मातृभूमी'च्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यासाठी सरकारकडून दबाव आणल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानने या वृत्तांवर स्पष्टीकरण दिलं आहे, नेमकं काय म्हणाला भाईजान?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मुंबईत 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमची उपस्थिती होती.
'मातृभूमी' चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव नव्हता, असे सलमान खानने स्पष्ट केले. यासंदर्भातील वृत्त निराधार असल्याचेही त्याने सांगितले.
चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्याच्या चर्चांवर सलमान खानने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'रिराइट करा, हे सगळं बकवास आहे. असं काहीही नाही,' असे तो म्हणाला.
मातृभूमी' हा चित्रपट सैनिकांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामोरे जाव्या लागणाऱ्या परिस्थितीवर आधारित असल्याचे सलमान खानने सांगितले. चित्रपटात कोणतीही नकारात्मकता नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
यापूर्वी 'बॅटल ऑफ गलवान' या नावाने चर्चेत असलेल्या चित्रपटाचे नाव बदलून 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' असे करण्यात आले आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे
सर्व फोटो साभार - सलमान खान फिल्मस (Salman Khan Films) यूट्यूब चॅनेल