
सध्या पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. मुंबई, कोकण, पुणे तसेच अन्य जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसत आहेत.

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.

तसेच, कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.