
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी काल निकाला लागला. विशेष एनआयएन न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

तब्बल 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाच्या या निकालानंतर मालेगावकरांनी आपली शांततेची परंपरा व जातीय सलोखा अबाधित ठेवत दैनंदिन जीवनाला सुरुवात केली.

मात्र, बाँबस्फोट निकालाच्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क असून शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यास आता सुरुवात केली आहे.

कालचा ठेवलेला बंदोबस्त व्यतिरिक्त आज दोन अतिरिक तुकड्या मागवून त्या अलर्ट ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नाशिकचे ग्रामीण पोलिस जिल्हा अधीक्षक यांनी मालेगावकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे देखील नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सांगितले.