CAA Protest : PHOTO : मालेगावात मुस्लिम संघटनांचा भव्य मोर्चा
मालेगावात आज विविध मुस्लिम संघटनांनी भव्य मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवला.

या मोर्चात मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
- मालेगावात आज विविध मुस्लिम संघटनांनी भव्य मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात दस्तुर बचाव कमिटी आणि जमेतूल उलेमासह सर्व मुस्लिम संघटनांनी सहभाग घेतला.
- विशेष म्हणजे या मोर्चात सहभागी होण्यासाठी आज मालेगावच्या पूर्व भागात शाळा कॉलेज आणि यंत्रमाग व्यवसाय, दुकाने आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या.
- नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या नावाने, धर्माच्या आधारावर विभाजन करण्याचा आणि मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
- भुईकोट किल्ल्यापासून निघालेला मोर्चा निशांत चौक, आझाद नगर, मुशावरत चौक, मोहम्मद अली रोड आदी मार्गावरुन मार्गक्रमण करून किडवाई रोड जवळ शहीदो की यादगारजवळ मोर्चाची सांगता करण्यात आली.
- या मोर्चात मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
- मालेगाव मोर्चा
- मालेगाव मोर्चा
- मालेगाव मोर्चा
- मालेगाव मोर्चा










