Manoj Jarange Patil : सावलीत बसा या विखे-पाटलांच्या विनंतीवर मनोज जरांगे बोलले, जर मी उन्हात बसलो तर..

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे प्रमाणपत्राच्या मागणीसाठी रणरणत्या ऊन्हात आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समजूतघालण्याचा प्रयत्न करत आहेत.

| Updated on: May 30, 2026 | 11:59 AM
1 / 5
तुम्ही कितीही चांगलं दिलं तरी गायकवाड समितीने 12-13 टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं, तरी चॅलेंज झालं. सातारा गॅझेट असो वा हैदराबाद गॅझेट मराठ्यांना सुखाने खाऊ देत नाहीत. माझी विनंती आहे जीआर काढावा. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सगळ्या अभ्यासकांनी इथे यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

2 / 5

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना सावलीत बसण्याची विनंती केली, त्यावर त्यांनी मी ऊन्हात बसलो, तर चटके तुम्हाला बसणार, त्यासाठी मी इथेच बसणार असं उत्तर दिलं.

3 / 5

आपण समान विचारावर काम करतोय. आपण सावलती बसा, अभ्यासक आलो की मग आपण चर्चा करु, मी उपलब्ध आहे. तु्म्हाला माझी विनंती आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

4 / 5

तुम्ही माझा सन्मान ठेवला, मी तुमचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा होईल. मला भोगू द्या, माझी तुम्हाला विनंती आहे. मी कुठल्या मंत्र्यासमोर हात जोडत नाही, पण मला भोगू द्या असं मनोज जरांगे पाटील बोलले.

5 / 5

सातारा गॅझेट आत्ताच पाहिजे अशी तुमची भूमिका आहे, त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, एक महिना त्यांनी मागितलेला. आपण दहा महिने दिले. जीआर काढतील मुख्यमंत्री, विखे पाटील साहेब असं जरांगे बोलले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us