Rain Update : पाऊस धो-धो कधी बरसणार, नवी तारीख नवा अंदाज आला, शेतकऱ्यांनो पेरणी करण्याआधी हे वाचाच!

शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा पेरणी करू, याची शेतकऱ्याला उत्सुकता लागली आहे. परंतु अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

| Updated on: Jun 13, 2026 | 7:05 PM
1 / 5
यंदा मान्सूमध्ये चांगलाच बदल झाला आहे. अगोदर मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अपेक्षेपक्षा बरेच दिवस उलटले असले तरीही अद्याप मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापलेला नाही.

2 / 5

शेतकऱ्यांनी पेरणीची सर्व तयारी करून ठेवली आहे. कधी एकदा पाऊस येतो आणि कधी एकदा पेरणी करू, याची शेतकऱ्याला उत्सुकता लागली आहे. परंतु अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.

3 / 5

अगोदर 15 ते 16 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकू शकतो, असे सांगितले जात होते. परंतु अजूनही मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही. मान्सून मध्येच रेंगाळला आहे. यंदा सरासरी 90 टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

4 / 5

दरम्यान, आता नव्या अंदाजानुसार येत्या 22 जूननंतरच मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांनंतरच मान्सून पुण्यात धडकू शकतो.

5 / 5

दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन सरकारने केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us