AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : सौदी का अण्वस्रांच्या मागे का लागलाय?, किती मुस्लीम देशांकडे आहेत अणुबॉम्ब ?

आजच्या जगात ज्या देशाकडे अण्वस्र आहेत तो देश दुसऱ्या देशांवर दादागिरी करत आहे. अण्वस्रांच्या बळावर चारी बाजूंनी मुस्लीम देश असूनही इस्राईल जगात टिकून आहे.

Explained : सौदी का अण्वस्रांच्या मागे का लागलाय?, किती मुस्लीम देशांकडे आहेत अणुबॉम्ब ?
Atomic Bombs
| Updated on: Jul 25, 2026 | 6:57 PM
Share

आज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे संघर्ष सुरु आहे. प्रत्येक देश त्याच्या शत्रूला शस्रास्रे दाखवून घाबरवत आहे. अशात अण्वस्र असणाऱ्या देशांना जगात घाबरले जाते. जगातील ५७ मुस्लीम देश आहेत. त्यांच्याकडे तेलासह अनेक नैसर्गिक साधनसामुग्रीचे साठे आहेत. प्रचंड पैसा आणि आलिशान जीवन या देशातील सत्ताधीश या तेलाच्या संपत्तीमुळे उपभोगत आहेत. त्यांच्याकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही. मात्र, अण्वस्रांचा विषय येतो तेव्हा चित्र बिलकुल बदलून जाते. इराण या अण्वस्रांसाठी लढत आहे. सौदी अरब, अमेरिका सारख्या देशांकडे हात पसरत आहे. सौदी अरब, युएई वा तुर्की सारखे श्रीमंत देशांची जी हालत झाली आहे ती हैराण करणारी आहे. नेमक्या किती मुस्लीम देशांकडे अण्वस्रे आहेत ?

आजच्या जगात ज्या देशाकडे अण्वस्र आहेत तो देश दुसऱ्या देशांवर दादागिरी करत आहे. यामुळे उत्तर कोरियासारखा देश अण्वस्रांच्या जोरावर अमेरिकेलाही भिक घालत नाही अशी स्थिती आहे. इस्राईल सारखा पिटुकला देश केवल अण्वस्रांच्या बळावर चारी बाजूंनी मुस्लीम देश असूनही टिकून आहे.

५७ इस्लामिक देशातील केवळ एकच असा देश आहे जो स्वत:ला अण्वस्र इलास्मिक रिपब्लिक म्हणून जगातील मुस्लीम देशाचा नायक बनायला इच्छुक आहे. हा देश दुसरा तिसरा कोणी नाही तर आपला शेजारील पाकिस्तान आहे. जो भूकेने आणि आर्थिक संकटाने बेजार आहे. साल १९९८ मध्ये चागई येथे अणू चाचण्या करुन पाकिस्तान जगातला पहिला आणि एकमेव ‘मुस्लीम न्युक्लियर पॉवर’ बनला आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार आणि संरक्षण तज्ज्ञांच्या मते यासमयी पाकिस्तानकडे १७० अण्वस्र आहेत. पाकिस्तान शिवाय सौदी अरब, कतार, युएई, इराण, अफगाणिस्तान वा अल्बानिया सारख्या कोणत्याही मुस्लीम देशाकडे अणुबॉम्ब नाही.

संपूर्ण जगाचा विचार करता याक्षणी केवळ ९ देशांकडेच न्युक्लिअर वेपन्स आहेत. यात रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. या ९ देशातील पाच देश ( अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड ) सारख्या अण्वस्र अप्रसार करार ( एनटीपी ) अंतर्गत अधिकृतपणे ‘न्युक्लिअर वेपन स्टेट’ चा दर्जा मिळालेला आहे. एका आकडेवारीनुसार जगभरात या समयी एकूण १२,११९ न्युक्लिअर वॉरहेड आहेत, त्यात सुमारे ३,८८० शस्रास्रे एक्टीव्ह म्हणजे तैनातीसाठी सुसज्ज आहेत.

इस्रायलची सीक्रेट न्यूक्लिअर पॉवर आणि इराणचा सस्पेंस

इस्रायलने कधीच सार्वजनिक रुपाने त्यांच्याकडे अण्वस्रे असल्याचे मान्य केलेले नाही. परंतू जगातील अनेक संरक्षण एजन्सी आणि तज्ज्ञांच्या मते इस्रायलकडे ९० ते ३०० च्या दरम्यान अण्वस्रे आहेत. दुसरीकडे इराण सतत युरेनियम एनरिचमेंट करत आहेत. इराणचा दावा आहे की त्यांच्या अण्वस्र कार्यक्रम केवल शांतता पूर्ण कामांसाठी आणि वीज निर्मितीसाठी आहे. मात्र, इस्रायलला भिती वाटते, इराणला केव्हा ना केव्हा गुप्तपणे अणुबॉम्ब बनवू शकतो.

जगात कोणाकडे किती अण्वस्रे ?

रशिया :4,309 एक्टिव्ह वॉरहेड ( जगातील सर्वात जास्त )
अमेरिका: 3,700 एक्टिव्ह वॉरहेड
चीन:600 वॉरहेड
फ्रान्स: 290 वॉरहेड
ब्रिटन:225 वॉरहेड
भारत: 180 वॉरहेड
पाकिस्तान:170 वॉरहेड
इस्रायल:सुमारे 90 वॉरहेड
उत्तर कोरिया:सुमारे 50 वॉरहेड

सौदी अरबला का हवा अणूबॉम्ब

सौदी अरबकडे समृद्ध तेल भंडार असून या देशाकडे पैशाची कोणतीही कमतरता नाही. अब्जावधी डॉलरची अर्थव्यवस्था असूनही जेव्हा संरक्षणाची वेळ येते तेव्हा सौदीला अमेरिककडे हात पसरावे लागत आहेत. सौदीचा सर्वात मोठा शत्रू इराण आहे. सौदीला चांगल्या प्रकारे ठावूक आहे ही जर इराणला अण्वस्रे मिळाली तर या मध्य पूर्वेतील सत्ता संतुलन बिघडून जाईल. त्यामुळे इराणने जर भविष्यात अणूबॉम्ब बनवण्यात यश मिळवले तर सौदी अरबला अणूबॉम्ब विकत घ्यावा लागेल असे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे.

Follow Us
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...