PHOTO : नवी मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. (Navi Mumbai Highway Traffic Jam)

- मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
- नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- मानखुर्दजवळ नाकाबंदी असल्याने वाशी टोलनाक्याजवळ ही वाहतूक कोंडी झाली आहे.
- या ठिकाणी जवळपास 3 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
- त्यामुळे पाच किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी तासाभराचा अवधी लागत आहे. यामुळे अनेकांना निश्चित वेळेत पोहोचण्यास अडचणी येत आहेत.
- दरम्यान ही वाहतूक कोंडीची समस्या नेमकी कधी सुटणार, असा प्रश्न नवी मुंबईकर करत आहेत.






