
जगभरात नवीन वर्षाची सुरुवात ही जोरदार आतिषबाजीने करण्यात येते. . सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील सिडनी हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसमध्ये जबरदस्त आतिषबाजी करण्यात आली. हा सोहळा लाखो लोकांनी याची देहि, याची डोळा पाहिला.

दुबई, UAE मधील बुर्ज खलिफा टॉवरवर आतिषबाजी दिसून आली. या टॉवरवर लाईटिंग सजवण्यात आली. न्यूयॉर्क (USA) च्या टाइम्स स्केअरवर फायरवर्क्स, आतिषबाजी डोळ्याचे पारणे फेडते.

नवीन वर्ष 2025 चे न्युझीलँडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. ऑकलँडच्या स्काई टॉवर आज आतिषबाजी दिसून आली. आज जगभरात नवीन वर्षाचा जल्लोष दिसून आला.

ब्राझिलमधील रियो डी जेनेरियोमधील कोपाकबाना समुद्र किनारा आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील लेक बर्ली ग्रिफिनमध्ये खास शो होतो.

जगात सर्वात अगोदर टाईमझोननुसार, किरीटीमाटी बेट (क्रिसमस बेट) न्युझीलंड देशाने सर्वात आधी नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला. तर भारतापूर्वी 41 देशात नवीन वर्षाचे स्वागत होते.

नवीन वर्षाचा सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. प्रत्येकाने या दिवसाचे खास नियोजन केले आहे. तर काही जणांनी नवीन वर्षासाठी एक खास संकल्प सोडला आहे.