आपल्याला टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम करावं लागेल, नीति आयोगाच्या बैठकीत मोदींनी व्यक्त केली अपेक्षा!

नवी दिल्लीमध्ये नीति आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, उपराज्यपाल तसेच काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

| Updated on: May 24, 2025 | 5:12 PM
1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नवी दिल्ली येथे नीति आयोगाच्या गव्हर्निग काऊन्सिल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

2 / 7
या बैठकीला दक्षिण भारतातील तीन राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, तेलंगाणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी तसेच इतर मान्यवरांनी बैठकीला उपस्थित राहून त्यांच्या राज्याचे वेगवेगळे मुद्दे बैठकीत मांडले.

3 / 7
या बैठकीत मोदी म्हणाले की, राज्य तसेच केंद्र सरकार या दोघांनही टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम केल्यास कोणतेही ध्येय्य प्राप्त करणे शक्य आहे. या बैठकीला काँग्रेसशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अनुपस्थित होते.

4 / 7
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हेदेखील या बैठकीला उपस्थित नव्हते. त्याऐवजी त्यांनी राज्याचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांना या बैठकीला पाठवलं होतं.

5 / 7
नीति आयोगाच्या या बैठकीला पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी हेदेखील या बैठकीला उपस्थित नव्हते.

6 / 7
या बैठकीला वेगवगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र शासित प्रदेशांचे उपराज्यपाल तसेच काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

7 / 7
या बैठकीत मोदी यांनी देशाच्या विकासाची गती आणखी वाढवण्याची गरज आहे, अशी गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात राज्य तसेच केंद्र सरकार यांनी एकत्र येत काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केली.