
चिपळूण तालुक्यामधील ' तिवरे ' गावात धनगर वाडीतील ग्रामस्थांचा मूलभूत सोयींसाठी खडतर प्रवास सुरू झाला आहे. आजारी आजीला दवाखान्यात घेऊन जायचं तर रस्ता नाही.

नदीला पाणी आलं म्हणून आजीला नदीकाठी ठेवण्यात येतं. आजी पालखीत बसते. खरंतर ती पालखी कसली, जेमतेम एक लाकडाचा दांडा आणि त्याला बांधली चादर बांधली जाते.

अशा पद्धतीने तयार केली जाते पालखी यालाच डोली म्हणतात. आणि या डोलीत टाकून चादरीत बांधून, डोली खांद्यावर घेऊन डोंगर कपाऱ्या तीन ते चार किलोमीटर पार करत आजीला दवाखान्यात घेऊन घेऊन जाण्याचा रोजचा उपक्रम सुरू आहे.

तीवरे गावात सध्या वृद्ध महिला आजारी आहे, तिला अधून मधून दवाखान्यात घेऊन जावं लागतं. पण रस्ता नसल्यामुळे नागरिकांना डोलीत बसवून असा प्रवास करावा लागतो.

चिपळूण तालुक्यामधील तिवरे गावची गावात असणारा धनगरवाडी मध्ये जाण्याचा रास्ता कित्येक वर्षांपासून नाही. कुणी आजारी पडला माणूस किंवा आजारी नसला तरी देखील माणसं अशा पद्धतीने जंगलातून प्रवास करतात आणि प्रवासाची लढाई जिंकण्यासाठी त्यांना याच डोंगर कपाऱ्यातून किमान रोजचे तीन तास चालण्यासाठी घालावे लागतात .

माणूस आजारी पडलं की याच ठिकाणी पालखीत टाकून त्याला घेऊन दवाखान्यात जातात. रस्त्यावरती किमान एक पूल असावा म्हणजे पाण्यातून तरी प्रवासाची ग्रामस्थांची सुटका होईल असं स्थानिकांना वाटतंय.

राजकारणी केवळ मतांसाठी येतात, आश्वासन देण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत.आपल्या वाट्याला जे आलं ते मुलांच्या वाटायला येऊ नये म्हणून किमान पूल व्हावा अशी मागणी ते साश्रूनयनांनी करत आहेत.