Pawan Kalyan : उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात तिसऱ्यांदा वादळ, रशियन पत्नीसोबतचा संसार मोडला, वेगळं होण्याचं कारण काय?

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या आयुष्यात तिसऱ्यांदा वादळ आलंय. त्यांचा रशियन पत्नीसोबतचा संसार मोडला आहे. पवन कल्याण यांच्या कार्यालयाने त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली.

| Updated on: Nov 10, 2026 | 7:31 AM
1 / 5
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे.  त्यांची रशियन पत्नी अन्नी कोनिडेला यांच्यासोबतचा संसार मोडला आहे.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे. त्यांची रशियन पत्नी अन्नी कोनिडेला यांच्यासोबतचा संसार मोडला आहे.

2 / 5

पवन कल्याण आणि अन्नी कोनिडेला यांनी 13 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने आंध्रपदेश चर्चांना उधाण आलं आहे.

3 / 5

उपमुख्यमंत्री पवन यांच्या कार्यालयाने एका पोस्टमध्ये म्हटलं की, घटस्फोटाचा निर्णय परस्पर सामजंस्याने घेण्यात आलाय. आयुष्यातील अनेक वर्षे एकत्र घालवली. त्यानंतर परस्पर सामजंस्य आणि आदरपूर्वकरित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. लग्नाचं नातं संपुष्टात आलं तरी पुढेही चांगले मित्र राहू. आमच्या मुलांची पालक म्हणून भूमिका पुढेही सुरू राहील. मुलांचं सुख आणि कल्याण याला नेहमी प्राधान्य राहील'.

4 / 5

जोडप्याने हा आयुष्यातील कठीण काळ असल्याचे सांगितले. तसेच दोघांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं.

5 / 5

या प्रवासामध्ये साथ दिलेल्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर आमच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करावा, अशी विनंती त्यांनी केली. पवन कल्याण यांचा हा तिसरा विवाह होता. पवन यांनी रशियन अन्ना यांच्याशी 2013 साली विवाह केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us